Pune District : विमानतळासाठी तरतूद करा – शिवतारे
Updated On:

दिवे : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन म्हणून नावारूपाला येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलेले आहे.
मात्र अर्थसंकल्पात त्यावर तरतूद केलेली दिसत नाही. आपल्या उत्तराच्या भाषणात याबाबत स्पष्टता करावी, असे प्रतिपादन पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी आपल्या भाषणात केले आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेत ते बोलत होते.





