पुणे जिल्हा : राजगुरूनगरमध्ये महाआरोग्य शिबिर

राजगुरुनगर : राजगुरनगरचे सुपुत्र राष्ट्रीय नेते माजी खासदार स्व. बाळासाहेब आपटे यांच्या जयंतीनिमित्ताने राजगुरुनगर शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
येथील आपटे वाड्यात स्व. बाळासाहेब आपटे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, जिल्हा परिषद माजी सदस्य अतुल देशमुख,
भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम भोसले, नितीन गोरे, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, बाळासाहेब सांडभोर, स्व. बाळासाहेब आपटे स्मृती समितीचे अध्यक्ष अॅॅड. गणेश सांडभोर, सचिव स्वानंद खेडकर, लायन्स क्लब राजगुरूनगर अध्यक्ष नितीन दोंदेकर,
माजी अध्यक्ष मिलिंद आहेर, सचिव डॉ. सागर गुगलिया, रमेश बोर्हाडे, सागर लाखे, कृणाल रावळ, अमित टाकळकर, डॉ. विजय आंबरे, डॉ. उदय पवार, अॅड. सुदीप परदेशी, सुनील थिगळे, रेश्मा लाखे, प्रियांका घोरपडे, नीता गुरव, स्नेहल दोंदेकर, मीनल आहेर, अर्चना बोरा, वैशाली गुगलिया, नम्रता थीगळे, शिवानी वाडेकर, इम्रान मोमीन, धीरज कासवा,
अमित बानखेले, चेतन वाडेकर, डॉ. प्राची आंबरे, डॉ. शीतल पवार, नितेश मुथ्था, धनंजय डेव्हरकर, दिलीप तापकीर, राजेंद्र खेडकर, संजय भागवत, किशोर कुमठेकर, सी. एन. दीक्षित, कैलास दुधाळे आदी उपस्थित होते. या शिबिरात 123 रक्तदात्यांची रक्तदान केले. 238 रुग्णनाची रक्तातील साखर तपासण्यात आली.
350 जणांना रक्तवादीच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. 76 महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली. 365 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. 36 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. 215 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.





