महाळुंगे इंगळे – महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील द्वारका हाऊसिंग सोसायटी जवळील घाटेवस्ती येथे काल पहाटे मुख्य रस्त्यावर बिबट्या मुक्त संचार करताना कॅमेर्यात कैद झाला आहे. मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असणार्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडून आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. एक महिन्यापूर्वी देखील अशाच प्रकारे एका बिबट्याचा वावर परिसरात आढळून आला आहे. द्वारका हाऊसिंग सोसायटी हा मोठा प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. कामानिमित्त रात्री अपरात्री लोकांना घराबाहेर पडावे लागते पहाटेच्या वेळी देखील लोक मॉर्निंग वॉकला जातात आणि अशाच वेळी बिबट्याचे मुक्त संचार मुख्य रस्त्यावर दिसणे नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. वनविभागाने तात्काळ याची दखल घेत येथील मुक्त संचार करणार्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.