Pune district: जुन्नर, ओतूरला कांद्याची मोठी आवक

ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार जुन्नर, तसेच उपबाजार ओतूरमध्ये गुरूवारी (दि. 27) कांद्याची मोठी आवक झाली. दर्जानुसार कांद्यास दहा किलोस कमाल 200 रुपये तर तर किमान 100 रुपये असा बाजारभाव मिळत्तला, अशी माहिती सभापती अॅड. संजय शिवाजीराव काळे यांनी दिली.
ओतूर उपबाजारात कांद्याची 12,968 एवढी पिशवी आवक झाली. गोळा कांदा : 170 ते 200, सुपर कांदा : 130 ते 180, गोल्टी/ गोल्टा :30 ते 140, बदला कांदा : 30 ते 110. असा दर मिळत्तला तर बटाट्याची 851 पिशवी एतकी आवक झाली.
त्यास कमाल 200 तर किमान 200 असा दर प्रती दहाकिलोस मिळाला. लसूण 2 पिशवी आवक झाली त्यास किमान 300 ते कमाल 551 रुपये दहा किलोस दर मिळाला. एकूण आवक 13821 पिशवी झाली. येथे लिलावाचे दिवस गुरुवार आणि रविवार असून लिलावाची वेळ सकाळी 10 ते लिलाव होईपर्यंत आहे.
मुख्य बाजार जुन्नरमध्ये कांदा 1159 पिशवी आवक झाली. प्रति 10 किलोस नंबर 1 (गोळा)- 170 ते 190, नंबर 1 (सुपर कांदे)- 140 ते 170, नंबर 2 (गोल्टा/गोलटी)- 50 ते 140, नंबर 3 (बदला)- 100 ते 130 रुपये असा दर मिळाला. बटाट्याची 561 पिशवी आवक झाली. त्यास किमान 50 ते कमाल 170 रुपये प्रती 10 किलो दर मिळाला.





