पुणे जिल्हा : काटी गावचा विद्यार्थी अधिकारी बनला पाहिजे

आमदार भरणे ः वाचनालय अभ्यासिका इमारतीचे भूमिपूजन
इंदापूर – काटी गावातील शासनाच्या विविध विभागात वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी आपल्या गावाचे नाव उज्वल करीत आहेत. या गावातील झोपडीतील विद्यार्थी देखील आगामी काळात, वरिष्ठ अधिकारी जिल्हास्तरावर राज्यस्तरावर झाला पाहिजे. यासाठी अद्यावत अभ्यासिका, वाचनालय इमारतीच्या, बांधकामासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा फायदा घ्यावा. असे आवाहन राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर तालुक्यातील काटी गावात आमदार दत्तात्रय भरणे यांच्या विशेष प्रयत्नातून, जिल्हा वार्षिक योजनेच्या अंतर्गत नागरी सुविधासाठी वाचनालय, अभ्यासिका उभारण्यासाठी 25 लाखांचा निधी मंजूर झाला. या अभ्यासिकेचे भूमिपूजन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी काटी ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ साहेबराव मोहिते, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, शेतीनिष्ठ शेतकरी साहेबराव मोहिते,
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुलराव झगडे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस अधीक्षक दिनकर मोहिते, माजी सरपंच रेखा मरगळ, डॉ. अमोल गोरे, प्रकाश राऊत, संतोष मोहिते, तुकाराम मोहिते, संजय परांडे, रोहिदास मोहिते, राहुल मोहिते, मारुती बाशिंगे, शिवाजी मोहिते, मल्हारी शिंदे, महादेव मोहिते, शरद बोराटे, महादेव यादव, रणजीत बोराटे, लखन परांडे, शिवाजी माने, विकास भोसले, अजिनाथ भोसले, महादेव मासाळ, दत्तात्रय माने, विठ्ठल मरगळ, प्रकाश भोसले, तसेच भरतवाडी फाऊंडेशन व ग्रीन काटी चे सर्व पदाधिकारी व काटी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सरपंच सोमनाथ मोहिते यांनी केले, तर भरतवाडी फाउंडेशनचे सुनील मोहिते यांनी आभार मानले.
आजची पिढी घडवली तरच उद्याचे भविष्य चांगले दिसणार आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी जे शिकत आहेत, त्यांच्याकडे अधिकचे लक्ष दिले जावे. गावाची व आपली जबाबदारी त्यांचे शिक्षण परिपूर्ण करून घ्यायचे आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना येथील अभ्यासिका लाभदायक ठरणार आहे.
-दत्तात्रय भरणे, आमदार





