पुणे जिल्हा : जरांगे पाटील यांचे खंडोबा देवाला आरक्षणासाठी साकडे

जेजुरी – मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी जेजुरी गडावर येऊन महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचे दर्शन घेतले. कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेत मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळू दे, असे साकडे आपण खंडोबा देवाला घातले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी जुनी जेजुरी येथे जाहीर सभेत बोलताना सांगितले.
दौंड तालुक्यातील वरवंड येथील सभा झाल्यावर जरांगे पाटील यांचे जेजुरी येथे आगमन झाले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पगडी व खंडोबा देवाची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. देवदर्शना नंतर जुनी जेजुरी येथे त्यांनी सकल मराठा समाजाशी संवाद साधला. कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी व पंचक्रोशीतील सकल मराठा समजाच्या वतीने करण्यात आळे होते.
जेजुरी सकल मराठा समाजाचे नेते संदीप जगताप, सुधीर गोडसे, सतीश घाडगे, अजिंक्य देशमुख, उमेश जगताप, अनिकेत हरपळे, तानाजी जगताप आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.





