पुणे जिल्हा: जागृती महाजन भाजप महिला मोर्चा तालुका सरसिटणीस पदी

मंचर (ता. आंबेगाव): आंबेगाव तालुका भाजपा मोर्चा महिला सरचिटणीस पदी जागृती महाजन यांना येथे नियुक्तीपत्र देताना भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी.
मंचर – मंचर (ता. आंबेगाव) येथील जागृती महाजन यांची भाजप महिला मोर्चा आंबेगाव तालुका सरसिटणीसपदी नियुक्ति करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंचर येथे भाजप आंबेगाव तालुका पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, सरसिटणीस डॉ. ताराचंद कराळे, सरसिटणीस संजय रौंदळ, जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग शेठ एरंडे, भाजप उत्तर पुणे जिल्हा सचिव प्रमोद बाणखेले, तालुका अध्यक्ष संदीप भाऊ बाणखेले, महिला मोर्चा जिल्हा सरसिटणीस ऍड. स्वप्ना खामकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष ज्योती काळे यांच्या उपस्थितीत गृती महाजन यांची नियुक्ती तालुका सरसिटणीस पदी करण्यात आली.
महाजन यांनी मंचर शहर अध्यक्ष म्हणून काम करत असताना महिलांचे उत्तम संघटन केले, तसेच नेहमी समाजिक कार्यात अग्रेसर राहत विविध समाजिक समस्यांवर मंचर पोलीस स्टेशन, नगर पंचायत तसेच विद्युत महामंडळ येथे निवेदने दिली. विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, तसेच सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याकरिता ई-श्रम कार्ड, मतदान नोंदणी कार्ड, आयुष्मान कार्ड शिबिराचे आयोजन केले. गोरगरिबांच्या, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी दूर करण्यात नेहमी पुढाकार घेतला. या सर्व कार्याची दखल घेऊन पक्ष श्रेष्ठींनी आंबेगाव तालुका महिला मोर्चा सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र देऊन महाजन यांना शुभेच्छा दिल्या.





