वाघोली : लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत कोलवडी येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारा आरोपी सोसायटीमध्ये राहणार्या महिलांना फोन करून त्रास देणे, अश्लील शेरेबाजी करणे अशा प्रकारची तक्रार सोसायटीमधील राहणार्या महिलांकडून प्राप्त झाल्याने लोणीकंद पोलीस स्टेशन येथे तात्काळ गुन्हा दाखल करून, 24 तासात तपास पूर्ण करून दोषारोप दाखल करण्यात आले. माननीय शिवाजीनगर कोर्ट येथे दाखल केले असता आरोपीला न्यायालयाने आर्थिक दंडाची शिक्षा, दंड न भरल्याने साधा कारावास सुनावली आहे. सिद्धेश्वर बिरादार (वय 30, रा. कोलवडी) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी साक्षीदार न्यायालयात साक्ष कामी हजर झाले असता न्यायालयाने 24 तासात केस चालवून व आरोपीने केलेला गुन्हा कबूल केला. या गुन्ह्यामध्ये आरोपी यास 10,000 रुपये द्रव्यदंड, कोर्ट उठेपर्यंत न जाण्याची शिक्षा व फिर्यादी यांना नुकसान भरपाई 5000 रुपये तसेच हा दंड न भरलेस 11 दिवसांच्या साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली. गुन्ह्याचा तपास डीसीपी झोन 4 हिम्मत जाधव, एसीपी प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजया पंडित वंजारी यांनी केला. त्यांना आशिष लोहार, विठ्ठल केदारी यांनी सहकार्य केले.