वाघापूर : पुरंदर तालुक्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. काही भागांमध्ये शेती पिकाचे नुकसान झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी गुरुवारी (दि. 22) टेकवडी गावामध्ये जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली असता बाजरीच्या पिकाचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
नुकसानीची पाहणी करून तहसीलदार राजपूत यांनी तलाठी सागर कुचेकर यांना पंचनामे करून तहसील कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत.
यावेळी तलाठी सागर कुचेकर, कृषी सहाय्यक अमर मोहिते, महेश आंबले, स्वप्निल आंबले, नवनाथ इंदलकर, विजय झिंजुरके, विनस इंदलकर, सोमनाथ इंदलकर,खंडेराव इंदलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तहसीलदारांनी पाहणी केली पण नुकसानभरपाई खरच मिळणार का व कधी मिळणार असाही प्रश्न सध्या शेतकरी उपस्थित करित आहेत.