Pune District :बारामतीत महाआरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग : उपमुख्यमंत्री पवार यांच्या वाढदिनी आरोग्यमय उपक्रम
शहराध्यक्ष जय पाटील यांच्यासह टीमचे नेटके नियोजन
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस शहर राष्ट्रवादीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मंगळवारी (दि.२२) महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला. यामध्ये विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांचा समावेश होता,अशी माहिती बारामती शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.
बारामती शहर राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने महारक्तदान व महाआरोग्य शिबिराचे आयोजन भिगवण चौक येथील शारदा प्रांगण येथे केले होते. यावेळी आरोग्य शिबिर महिला, पुरुष, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी खुले होते. शिबिरात पुणे शहर व बारामतीतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हाडांची तपासणी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, हृदयरोग तपासणी, मधुमेह, मूत्रविकार तपासणी, मूत्राशय व किडनीचे आजार, ब्लडप्रेशर, ईसीजी, हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन तपासणी, व्हेरीकोज व्हेन्स तपासणी केली.
महिलांसाठी हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, थायरॉइड, कॅन्सर स्क्रीनिंग, मार्कर टेस्ट, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफेरोसिस, लहान मुलांसाठी बालदमा, थायरॉइड, बालरोग तपासणी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. डाॅ. विशाल मेहता, डाॅ. निकिता मेहता, डाॅ. साैरभ मुथा, डाॅ. सुनील ढाके, डाॅ. सचिन घोरपडे, डाॅ. प्रीती मगर, डाॅ. सूरज भगत, डाॅ. शैलेंद्र थावरे, डाॅ. पांडुरंग गावडे, डाॅ. स्वामी ऋषिकेश, डाॅ. सूरज दुर्गुडे, डाॅ. मकरंद गाडेकर, डाॅ. स्वप्नील महाजन, डाॅ. राहुल आगवणे, डाॅ. वैभव मगर, डाॅ. हेमंत नाझीरकर आदी डाॅक्टरांनी तपासणी केली. बारामती केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
शिबिर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शहराध्यक्ष जय पाटील, महिला शहराध्यक्ष अनिता गायकवाड, युवक अध्यक्ष अविनाश बांदल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजित रक्तदान शिबीरास देखील उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे शहराध्यक्ष पाटील यांनी सांगितले. संतोष आण्णा सातव मित्रमंडळाच्या वतीने नगरपरिषद कर्मचार्यांसाठी रेन कोट वाटप, यादगार फाउंडेशन अमजद बागवान यांच्या वतीने अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
सर्व वयोगटांसाठी तपासणी, मार्गदर्शन
पुरुषांसाठी मोफत तपासणी हाडांची तपासणी गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी,तसेच हृदयरोग तपासणी , मूत्रविकार तपासणी (मूत्राशय व किडनीचे आजार), ब्लड प्रेशर, ई.सी.जी., हृदयाचे ठोके (पल्स), रक्तातील ऑक्सिजनची तपासणी, वेरीकोस व्हेन्सची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन, किडनी, लिव्हर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, थायरॉइड, कॅन्सर स्क्रीनिंग मार्कर टेस्ट, हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरोसिस आदी तपासण्या करण्यात आल्या. लहान मुलांसाठी मोफत बालरोग तपासणी व चिकित्सा (बालदमा-थायरॉइड) आदी तपासण्या करण्यात आल्या.





