Pune District : मंचर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले
Updated On:

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. सुमारे अर्धा तास चालू असलेल्या पावसाने मंचर शहरातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले.
मंचर परिसरात सुमारे अर्धा तास जोराचा पाऊस झाला. झालेल्या पावसाने ऊस पीक सोडून इतर पिकांना मात्र हानिकारक ठरणार आहे. तरकारी पिके खराब होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसात होत असलेल्या पावसामुळे शेतीला वापसा नसल्याने ऊस लागवड खोळबली आहे.
सद्यस्थितीत शेतकरी पाऊस उघडण्याची वाट पाहत असताना जोरदार पाऊस सर्वत्र पडत असल्याने शेतकऱ्यांची शेती कामे रखडली आहे. हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांचीही आर्थिक ओढाताड होऊ लागल्याचे दिसून येते. पंधरा दिवस शेतकरी होत असलेल्या पावसामुळे चिंताग्रस्त झाला आहे. पाऊस उघडण्याची वाट पाहत असल्याचे शेतकऱ्र्यांनी सांगितले.





