पुणे जिल्हा : सोयाबीनची हार्वेस्टरने काढणी

ओतूर – जुन्नर तालुक्यात ओतूर व परिसरातील गावांमध्ये सोयाबीन काढणीला वेग आला असून सोयाबीन काढणीसाठी शेतकर्यांकडून हार्वेस्टरचा वापर होताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाला चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे सोयाबीनचे पीक खराब झाले होते. आता पावसाने उघडीप घेतल्याने सोयाबीन काढणीला मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली आहे.
शेतकर्यांना एका एकर मधील सोयाबीन काढण्यासाठी सोयाबीन कापणी व गोळा करून गंज मारून ठेवण्यासाठी पाच ते साडेपाच हजार रूपये मजूरी मोजावी लागत असे; परंतु सध्या शेतकरी उपनेरमध्ये सोयाबीन तयार करताना दिसत आहे.
एका पोत्याला 500 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे बहुतेक शेतकरी वाढत्या मजूरीला कंटाळुन हार्वेस्टरने सोयाबीन करत आहेत. हार्वेस्टरने सोयाबीन कापणी व तयार करणे दोन्ही एकाच वेळी होऊन एकरी चार हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे वेळेची व पैशांची बचत होत असल्याने शेतकरी हार्वेस्टरने सोयाबीन करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.





