घोडेगाव : हिरडा पिकाला हमीभाव मिळावा.यासाठी किसान सभेचा वतीने घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी हिरड्याच्या झाडाची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार.असे आश्वासन नायब तहसीलदार शांताराम किर्वे यांनी दिले. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात हिरडा हे प्रमुख नगद रक्कम देणारे महत्त्वपूर्ण पीक आहे. हिरडा पिकासाठी आदिवासी महामंडळाने मागील वर्षी प्रतीकिलो १७० रुपये हमीभाव जाहीर केला होता व त्याप्रमाणे हिरड्याच्या खरेदीला सुरुवात देखील केलेली होती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने नुकताच घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर निर्धार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी किसान सभेच्या शिष्टमंडळ व विविध विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक होऊन खालील सकारात्मक निर्णय झाले.विविध निर्णय होऊन हा मोर्चा स्थगित करण्यात आला. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अशोक काळे पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य विजय आढारी यांनी पाठींबा दिला. या बैठकीला सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील, सोनूल कोतवाल, आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी रोहित बनसोडे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, नायब तहसीलदार शांताराम किर्वे, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, यांच्या बरोबर जल जीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. किसान सभेच्या वतीने डॉ.अमोल वाघमारे,अशोक पेकारी, राजू घोडे,नंदा मोरमारे, रामदास लोहकरे, कृष्णा वडेकर, दत्ता गिरंगे, कमल बांबळे, सुभाष भोकटे, अनिल किर्वे, अर्जुन काळे, अशोक जोशी,विश्वास साबळे, समीर डामसे, सागर काठे, राजू बांबळे, अशोक वरे, काळू कढण आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.