Pune District : मोईत विकासकमांचे भूमिपूजन, उद्घाटन

चिंबळी : मोई (ता. खेड) येथे रविवारी (दि. 30) सकाळी 10.30 वाजता गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जनजीवन मिशन योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या इमारतीचा वास्तुशास्त्र व भूमिपूजन तसेच उद्घाटन समारंभ आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आला, असे सरपंच शिलाताई रोकडे यांनी सांगितले.
यावेळी खेड तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती कल्पना गवारी, उपअभियंता के. एन. खरात, कनिष्ठ अभियंता एम. एम. शुंगारे, सरपंच शिलाताई रोकडे, उपसरपंच सोमनाथ गवारी, सदस्य संतोष येळवंडे, सदस्या आरती फलके, सारिका करपे, ग्रामपंचायत अधिकारी दमयंती शेंडगे, पोलीस पाटील निखील रोकडे,
माजी आदर्श सरपंच पाटील गवारे, उपसरपंच गोरख गवारे, किरण गवारे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रोकडे, संतोष गवारे व सर्व आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.





