पुणे जिल्हा : गावडेवाडी पाणीपुरवठा योजना तात्पुरती बंद

नागरिकांचे हाल; पाणी पुरवठा सुरळीत होण्याची मागणी
वाघोली : गावडेवाडी, शिरसवडी पाणीपुरवठा योजना नवीन वीज जोडणीच्या कारणासाठी तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याने ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होऊ लागले आहेत. पाणीपुरवठा योजनेला नवीन वीज कनेक्शन तातडीने देऊन महावितरण ने ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थ प्रमोद गावडे यांनी निवेदनाद्वारे महावितरण कडे केली आहे.
याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गावडे यांनी सांगितले की गेल्या सात दिवसापासून नवीन वीज जोडणी कारणास्तव पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीकडून बंद करण्यात आली आहे. नवीन विज जोडणी तातडीने महावितरण कडून मिळून नागरिकांच्या पाण्याचा सोडवावा अशी मागणी महावितरण कडे केली आहे. या कामी महावितरण योग्य ते सहकार्य करून ग्रामस्थांचा प्रश्न सोडवणार असणारे असल्याचे आश्वासन महावितरण कडून देण्यात आल्याचे गावडे यांनी सांगितले.
गावडेवाडी, शिरसवडी ग्रामपंचायतच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना नवीन वीज कनेक्शन मिळणे कामी तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून नवीन वीज कलेक्शन मिळाल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.
स्वाती राजगुरू, ग्रामसेवक शिरसवडी
गावडेवाडी, शिरसवडी पाणीपुरवठ्याच्या बाबतीत संबंधित ग्रामसेविका यांना पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भूषण जोशी , गटविकास अधिकारी पंचायत समिती हवेली





