पुणे जिल्हा : आमदार बेनकेंमुळे जुन्नरमध्ये विकासाची गंगा

कार्यकर्त्यांची भावना : पुन्हा विधानसभेत पाठविण्याचा बांधला चंग
नारायणगाव : जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी काँग्रेस) तथा विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे विधानसभा 2024 च्या होत असलेल्या निवडणुकीत यशाला गवसणी घालणार अशी भावना कार्यकर्ते बोलून दाखवत आहे. आजपर्यंत जुन्नर तालुक्याला विकास कामांसाठी कधीही न मिळालेला निधी अतुल बेनके यांच्या काळात मिळाला असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत.
आमदार अतुल बेनके जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी व गोरगरीब जनतेसाठी देव माणूस असून स्व. वल्लभ बेनके यांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असल्याची जनसामान्यांची भावना आहे. बेनके यांचा शांत, संयमी, वयोवृद्धांचा आदर करणारा, सर्वसामान्यांचा सन्मान करणारा, गोरगरिबांची विचारपूस करणारा, वारकरी संप्रदायाची सेवा करणारा, जातीभेद न मानणारा, महिलांना सन्मानाची वागणूक देणारा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ देणारा आणि हाती घेतलेले काम पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी अशी ओळख निर्माण केली असल्यचे कार्यकर्त्यांनसह नागरिकांनी सांगितले.
जुन्नर तालुक्यात शेती, पाणी, बिबट, धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार, हिंदू,मुस्लिम, बौद्ध समाजाची धार्मिक स्थळांची विकास कामे, ग्रामीण भागातील वाडी वस्त्यांवरील रस्ते, वीज, पाणी समस्या, साकव, पुल, सिंचनाच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, शाळांच्या सुधारणा, विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान, पर्यटन, हिरडा कारखाना पुनर्जीवित करणे, कोपरे मांडव्याचा पाणी प्रश्न सोडवले आहे. जुन्नर तालुक्याला समर्थपणे विकसित तालुका बनविण्यासाठी भविष्यातील योजना तयार करुन त्या अमलात आणण्यासाठी दमदार नेतृत्व करण्याची तयारी आणि धमक अतुल बेनके यांच्यात दिसून येते.
श्रेय वादासाठी कधीही प्रयत्न नाही
लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो अतुल बेनके यांच्यासारखा असावा अशी जनमानसात भावना आहे. बेनके तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला उद्धटपणे न बोलता व गरज नसताना आंदोलने, उपोषणे करून भावनिकता निर्माण करीत नाही. तर लोकप्रतिनिधी असल्याची जाणीव ठेवून शासन दरबारी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार बेनके भक्कमपणे प्रयत्न करीत असतात. प्रश्न सोडवत असताना श्रेय वादासाठी कधीही जाणीवपूर्वक प्रयत्न करीत नाही. तालुक्याचे विकास प्रश्न सोडवण्याचे कौशल्य बेनके यांच्यात असल्याचे कार्यकर्ते आपापसात बोलत आहे.
कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक
जुन्नर तालुक्याचे प्रश्न सोडवत असताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. विकास कामे करताना सत्ताधारी अथवा विरोधी असा दुजाभाव केला जात नाही. आपल्याकडे विकासकामे घेऊन आलेला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असला तरी तो आपलाच कार्यकर्ता आहे असे समजून त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाते. तर स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही तेवढ्याच मानसन्मानाने वागवले जाते. सर्वसामान्य माणूस आमदार बेनके यांना सहजपणे भेटू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि आपल्या प्रश्नांची चर्चा करून सोडवण्यासाठी हक्काने गळ घालतो.
कुटुंब समर्थपणे धुरा सांभाळतात
आमदार अतुल बेनके सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत असताना आणि तालुक्याची विकासकामे करताना त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे कुटुंबातील आई राजश्री बेनके, पत्नी गौरी बेनके, भाऊ अमित व डॉ. अमोल बेनके, भावजय डॉ.पल्लवी व धनश्री बेनके समर्थपणे धुरा सांभाळतात. घरी आलेल्या तालुक्यातील जनतेची आस्थेने विचारपूस करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार अतुल बेंनके यांना सांगत असतात.





