Pune District: भोर पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे यांचे निधन
Updated On:

भोर : भोर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोक उर्फ बाळासाहेब विठ्ठलराव थोपटे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी राहत्या घरी हातनोशी (तालुका भोर) येथे हृदयविकाराने निधन झाले. बाळासाहेब थोपटे हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.
राजगड ज्ञानपीठाचे विश्वस्त, रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेचे सचिव होते. त्यांचा सामाजिक, राजकीय, सहकार, क्षेत्रात मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या अंतयात्रेत सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, क्रीडा, पारमार्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता.
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुतणे तर माजी आमदार संग्राम थोपटे यांचे चुलत बंधू होत. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध मातोश्री, दोन विवाहित मुले, दोन विवाहित मुली, सुना नातवंडे, दोन बंधू असा मोठा परिवार आहे.





