पुणे जिल्हा : वडगाव आनंदचे सरपंचासह आठ सदस्य बिनविरोध

सात जागांसाठी दुरंगी, तिरंगी निवडणूक
राजुरी – जुन्नर तालुक्यातील महत्वाची, आळेफाटा व्याप्तीप्राप्त असणारी वडगाव आनंद ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र आज उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले आहे. सरपंचपदी रेलिका अरुण जाधव यांची बिनविरोध निवड झाली असून सदसपदी आठ उमेदवारांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित सात जागांसाठी दुरंगी आणि तिरंगी लढत होणार आहे.
वॉर्ड क्र. 1 मधून अ.जा. स्त्री गटात अर्चना नितीन काशिकेदार यांची बिनविरोध निवड झाली. तर इतर दोन जागांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात दीपाली मनिष गडगे, शीतल गणेश भुजबळ, वंदना अरविंद शिंदे यांच्यात तर सर्वसाधारण पुरुष गटात गणेश मच्छिंद्र भुजबळ विरुद्ध सचिन दत्तात्रय वाळुंज अशी लढत होणार आहे. वॉर्ड क्र. 2 मध्ये सर्वसाधारण पुरुष गटात प्रताप रामभाऊ शिंदे, प्रफुल्ल भाऊसाहेब इथापे, कैलास बाबुराव वाळुंज अशी लक्षवेधी तिरंगी लढत आहे. सर्वसाधारण स्त्री गटात वैशाली देवकर यांना पुनःश्च ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध संधी मिळाली. अ.जा. स्त्री गटात अल्पना सचिन देवकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.
वॉर्ड क्र. 3 मध्ये संदिप सुखदेव गडगे, संतोष रेवबा पादीर, कल्पना संपत पादीर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वॉर्ड क्र. 4 मध्ये ऋषिकेश पांडुरंग गडगे, निशा नवनाथ वाळुंज यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. 1 जागेसाठी संतोष बबुशा साबळे व गोरक्षनाथ तानाजी देवकर नशीब आजमावत आहे. वॉर्ड क्र. मध्ये तीन वेगवेगळ्या जागांसाठी तुल्यबळ लढत होणार आहे.
सर्वसाधारण पुरुष गटात सोमनाथ गोविंद गडगे व नितीन रघुनाथ चौगुले, ना. मा. प्र. महिला गटात विघ्नहर सहकारी साखर कारखाना माजी व्हाइस चेअरमन कै. भिमाजी कमळू गडगे यांच्या सुनबाई अमृता सुरेश गडगे व शोभा संतोष शिंदे यांच्यात तर सर्वसाधारण स्त्री गटात अश्विनी राम चौगुले व रंजना बबन गुंजाळ यांच्यात लढत होणार आहे. सर्व लढत देणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य 5 नोव्हेंबर रोजी मतदारांमार्फत मतपेटीमध्ये बंद होणार असून निकाल 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.





