पुणे जिल्हा। पावसामुळे जलपर्णी गेली वाहून मात्र प्रदूषण ”जैसे थे”च

चिंबळी । गेल्या काही दिवसांपासून मुंबईसर संपुर्ण राज्यात मुसळधार पाऊसाने जोरदार हजेरी लावली. अशात श्रीक्षेत्र आळंदी ते देहू येथून इद्रायंणी नदीच्या पात्रात मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.
मोशी कुरूळी हद्दीतील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुन्या पुलावरून जलपर्णी वाहून गेली आहे. गेल्या आठ महिन्यापासून मोशी चिंबळी हद्दीत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या केटी बंधा येथे मोठ्या प्रमाणात जलपर्णी पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे जलपर्णी पुर्ण वाहून गेली असून इंद्रायणी नदी जलमुक्त झाली आहे. पावसामुळे या परिसरातील शेतकरी सुखावला आहे.
येत्या दिवसात भात लावणीला वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर चिंबळी मोशी परिसरातील काही भागात सततच्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाले आहे. सध्या मावळात सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पाणी आले असून नदीतील जलपर्णी वाहून गेली असली तरी नदी प्रदूषितच असल्याचे आधूनमधून येणार्या दुर्गंधीतून स्पष्ट होत आहे.





