Pune District : ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह; तरुणाला कैद, दंडाची शिक्षा
Updated On:

वाघोली : ड्रंक अँड ड्राइव्हच्या प्रकरणात वाघोली वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईनंतर वाघोलीतील एका तरुणाला न्यायालयाने 3 दिवसांची साधी कैद व 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
एक जून रोजी झालेल्या कारवाईतील गुन्ह्यानुसार चित्तरंजन प्रकाश बेवरा (वय 27, रा. आव्हाळवाडी फाटा, वाघोली) याच्यावर खटला दाखल करण्यात आला होता. शिवाजीनगर येथील मोटार वाहन न्यायालयात न्यायाधीश बिराजदार यांनी सुनावणी दरम्यान शिक्षा ठोठावली.
वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर तरुणास येरवडा कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी दाखल करण्यात आले. ही कारवाई वाघोली वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.





