पुणे जिल्हा : रिले स्पर्धेत डॉ. विनायक खेडकरांसह तिघांना रौप्यपदक
Updated On:

मंचर : इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिक राष्ट्रीय रिले स्पर्धेत मंचर (ता. आंबेगाव) येथील डॉ .विनायक खेडकर यांच्यासह इतर तिघांनी द्वितीय क्रमांक मिळवून, भारतात दुसरा क्रमांक मिळवून रौप्यपदक पटकाविले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे झालेल्या या इंडियन डॉक्टर्स ऑलिम्पिक राष्ट्रीय स्पर्धेत देशातून १ हजार ५०० खेळाडूंनी विविध प्रकारच्या खेळामध्ये भाग घेतला.
मंचर येथील डॉ. विनायक खेडकर, नागपूर येथील डॉ. केतन मोडक, पुणे डॉ. निलेश पाटील, मुंबई डॉ. दत्तप्रसाद जोगदंड यांनी यश मिळविले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
डॉ. विनायक खेडकर यांनी ४.१०० मीटर स्पर्धेत रौप्यपदक संपादन केले, तसेच वैयक्तिक खेळातही त्यांनी १०० मीटरमध्ये १२.८६ सेंकदासह वैयक्तिक सर्वौत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक मिळविले.





