पुणे जिल्हा : कोळवणमध्ये कुत्र्याची दहशत
Updated On:

पौड : कोळवण येथील गावठाणात पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला असून, बुधवारी (दि. 3) एकास व गुरुवारी तीन जणांचा चावा घेतला. यामध्ये वयाची साठी पार केलेली दोन महिला; तर पन्नास वय असणारे दोन पुरुष आहेत.
हा कुत्रा अचानक अंगावर येऊन चावा घेतलेल्या जखमी झालेल्यांचे म्हणणे आहे. कोळवण येथील आरोग्य केंद्रात या जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना अॅन्टीरेबीज इंजेक्शन दिले.
मात्र, त्यांच्या जखमा खोल असल्याने पुढील उपचारांसाठी औंध व ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती कोळवण येथील आरोग्य पथकप्रमुख डॉ. माधवी शिंदे व पंकज धिडे आणि गौरव साठे यांनी दैनिक प्रभातला दिली.





