Pune District: नऊ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप

मंचर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आंबेगाव तालुक्यातील १८ शाखांमार्फत बुधवार, दि.१६ पर्यत ९ हजार शेतकऱ्र्यांना ९० कोटी रुपयांचे खरीपाचे पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे, अशी माहिती विभागीय अधिकारी विष्णू गायकवाड यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आंबेगाव तालुक्यात १८ शाखा असून मार्च २०२५ अखेर १८ शाखांनी ८८८ कोटी ३७ लाख रुपये इतके ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मार्च २०२५ अखेर तालुक्यातील सर्व प्रकारच्या कर्जाची येणेबाकी रक्कम ४२३ कोटी ७२ लाख रुपये इतकी आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आंबेगाव तालुका विभागातील सर्व १८ शाखा नफ्यात असून मार्च २०२५ अखेर एकूण एनपीए ९३ लाख ४३ हजार इतका आहे.
विभागामध्ये १८ शाखांना सलग्न ५९ विविध कार्यकारी सोसायटी असून त्यांच्यामार्फत २२ हजार ५९२ शेतकऱ्यांना १६ हजार २९५ हेक्टर क्षेत्रासाठी १६५ कोटी ४० लाख रुपयांचे खरीप हंगामासाठी गतवर्षी कर्ज वितरण केले होते. १५३ कोटी वसूल झाले असून मार्च २०२५ अखेर ९३.७२% वसुलीची टक्केवारी आहे.
चालू खरीप हंगामात ५९ विविध कार्यकारी सोसायटी संस्थामार्फत सर्व १८ शाखांमधून शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी सभासद २२ हजार ५९२, क्षेत्र १६ हजार २९५ हेक्टर, उद्दिष्ट १५२ कोटी ४० लाख रुपये गतवर्षीचे उद्दिष्ट होते.त्यापैकी १५३ कोटी ४० लाख रुपये वसूल झाले असून वसुलीचे टक्केवारी ९३.४० % आहे.बुधवार दि.१६ पर्यंत ९ हजार शेतकर्यांना ९० कोटी रुपयांचे खरीपाचे वाटप झाले आहे.उर्वरित शेतकर्यांना कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर वाटप केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.





