Pune District : पावणाआकरा कोटींचे पीक कर्ज वाटप

राजगुरूनगर : पाईट विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना खरीपचा हंगामासाठी पीककर्ज वाटप सुरू झाले असून आतापर्यंत 10 कोटी 84 लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन विजय करंडे व सचिव सुनील रौंधळ यांनी दिली.
खेड तालुक्यामध्ये सर्वात मोठी म्हणून गणल्या जाणार्या पाईट विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटप पीडीसीसी बँकेचे संचालक माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पहिल्या टप्प्यात तब्बल 10 कोटी 84 लाख, 87 हजार 500 रुपये पीक कर्ज वाटपाला प्रत्यक्ष मंगळवारी (दि.22) सुरुवात झाली. यामध्ये सोसायटीमधील 1108 शेतकरी सभासदांचा पीक कर्ज वाटप सुरू झाल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पाईट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज वाटप सुरू झाले. यावेळी बँकेचे विभागीय अधिकारी टी. के. दौंडकर, शाखा अधिकारी आर. एस. आढारी, विकास अधिकारी आर, एस वाघमारे, संस्थेचे अध्यक्ष विजय करंडे, उपाध्यक्ष दिगंबर जांभळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष जयसिंग दरेकर, संस्थेचे संचालक पंडित रौंधळ, रामदास सावंत, अनिल डांगले, मच्छिंद्र डांगले, दिलीप खेंगले, साहेबराव चोरघे, अश्विनी रौंधळ, महेश शेटे, नितीन कावडे, अनंता करंडे, विकास रौंधळ, बाळासाहेब आहेरकर, नंदकुमार डांगले, ताराबाई बच्चे,काशिनाथ सोनवणे, शंकर रौंधळ, अनंता ओझरकर आदींसह मोठ्या संख्येने सभासद शेतकरी उपस्थित होते.





