वालचंदनगरच्या ‘क्रू एस्केप मोटर’ची “गगनयान’ला गती

वालचंदनगर – ‘इस्रो’च्या 50 वर्षांच्या यशस्वी भागीदारीचा सुवर्ण महोत्सवी क्षण असुन चंद्रावर स्वारी करण्यात यशस्वी ठरलेल्या “चांद्रयान 3’, मिशन आदित्य नंतर गगनयान मोहिमेमध्ये क्रू एस्केप सिस्टीम जेटीसनिंग ही मोटर पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीने तयार केलेल्या यानाची यशस्वी चाचणी झाली. मोहीम झाल्यानंतर वालचंदनगर कंपनीतील शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
नुकतेच आंध्र प्रदेशाच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रावरून टीव्ही – डी 1 रॉकेट आकाशात झेपावले. या रॉकेटच्या वरील बाजूस क्रू मॉड्युल होते. प्रत्यक्ष मोहिमेवेळी या मॉड्युलमध्ये तीन अंतराळवीर होत. आकाशात 17 किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर क्रु एस्केप सिस्टीमने रॉकेट पासून क्रु मॉड्युल विभक्त केले. हे क्रू मॉड्युल खाली कोसळत असताना जमिनीपासून सुमारे अडीच किलोमीटर उंचीवर पॅराशूट उघडले.
यानंतर ते अलगदपणे बंगालच्या उपसागरात उतरले. यासोबत नियोजनुसार चाचणी यशस्वी पार पाडल्याबद्दल वालचंदनगर व परिसरातून आनंद उत्सव साजरा केला गेला.
नुकत्याच झालेल्या चाचणीमध्ये वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या क्रू एस्केप सिस्टीम जेटीसनिंग मोटर (सीजेएम) विकसित केले आहे. गगनयान मोहिमेसाठी वालचंदनगर कंपनी एचएस 200 सॉलिड रॉकेट बुस्टरसह इतर महत्त्वाची उपकरणे विकसित करून त्याचे टेस्टिंग केले आहे.
गगनयानाच्या पहिल्या चाचणीच्या यशाबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी, व्हाइस प्रेसिडेंट धीरज केसकर यांनी सर्व कामगार, इंजिनिअरचे कौतुक केले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची वालचंदनगर कंपनी गेल्या पन्नास दशकापासून यशस्वी काम करीत आहे.





