Pune District: बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत माहिती संकलन सुरु

शिक्रापूर ; शिरुर तालुक्यातल केंदूरसह परिसरातील बारा गावांतील दुष्काळप्रश्नी आवश्यक उपाययोजना तसेच संभाव्य जलस्त्रोत व पुल पुनर्भरण आणि चासकमान तथा डिंभा धरण कालव्यातून पाणी उपलब्ध होईल, असे पर्याय या सर्व माहितीचे संकलन करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
येत्या अधिवेशन काळात याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष बैठक घेण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांचे स्वीय सहायक गिरीश वसंतराव घुले यांनी दिली आहे.केंदूर येथे उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांच्या स्वीय सहायकपदी गिरीश वसंतराव घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी सरपंच प्रमोद पऱ्हाड, उपसरपंच शालन भोसुरे, माजी सरपंच सुनील थिटे, अविनाश साकोरे, सूर्यकांत थिटे, भरत साकोरे, जातेगावचे माजी सरपंच समाधान डोके, ग्रामपंचायत सदस्या मंगल साकोरे, शहाजी सुक्रे, मंगेश भालेकर, अभिजीत साकोरे, रामभाऊ साकोरे, बन्सी पऱ्हाड, उमेश साकोरे, विश्वास पऱ्हाड, मदन पऱ्हाड, रवींद्र साकोरे, गणेश साकोरे, अमित साकोरे, कुणाल साकोरे, बापूसाहेब साकोरे, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यातील प्रलंबीत कामांचा आढावा घेण्याची जबाबदारी घुले यांच्यावर सोपविलेली असल्याने शिरुरच्या दुष्काळी बारा गावांसाठी आपण काम करणार असल्याचे उर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांनी जाहीर केले होते.
त्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी घुले यांनी केंदूर गावातून सुरुवात केली आहे. इतर दुष्काळी गावांच्या ग्रामस्थांशी चर्चा ते करणार आहेत. माहितीसह उपलब्ध होणारे अहवाल घेऊन येत्या अधिवेशनात शिरुर तालुक्यातील बारा गावे दुष्काळमुक्ती बाबतची स्वतंत्र बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत घेतली जाणार असल्याचे देखील घुले यांनी सांगितले.





