पुणे जिल्हा : खेड न्यायालयात स्वच्छता अभियान

राजगुरूनगर – खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. साहेबरावजी बुट्टेपाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त साहेबरावजी बुट्टेपाटील महविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने खेड (राजगुरूनगर) जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परिसर स्वच्छ करण्यात आला.
स्व. साहेबरावजी बुट्टेपाटील हे राजगुरूनगर येथील न्यायालयात 30 ते 35 वर्षे वकीली क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वच्छता अभियान राबवले. न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. स्वयंसेवकांनी न्यायालयीन कामकाज समजून घेतले. राष्ट्रीय सेवा योजनेचे 117 स्वयंसेवक उपस्थित होते.
यावेळी न्यायाधीश ए. ए. घाणीवाले, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पी. एस. इंगळे, दुसरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर ए. एम. हुसेन, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, खेड तालुका वकील बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर, उपाध्यक्ष अॅड. अमोल तळेकर,
अॅड. वैभव कान्हूरकर, अॅड. अमोल भागवत, अॅड. पोपटराव तांबे, अॅड. संदीप घुले, अॅड. शंकर कोबल, प्रा. जी.जी. आहेरकर, प्रा. डॉ. टी. बी. वेहळे, प्रा. एस. एस. देशमुख, प्रा. ए. एस. लाळगे, प्रा. पी. एन. गदादे, प्रा. ए. एच. इनामदार, प्रा. एल. बी. काठे, प्रा. पी. पी. शिंदेकर, प्रा. आर. एस. कोकणे यांच्यासह न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते.





