पुणे जिल्हा : दुकानाच्या गाळ्यांच्या वादातून हाणामारी

सणसवाडीत घटना : कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह आठ जणांवर परस्परविरोधी गुन्हे
शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरुर) येथे दुकानांच्या गाळ्यांच्या वादातून चुलते पुतण्यात वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव माधव यादव, तुषार वैभव यादव, स्नेहल वैभव यादव, सुनिता वैभव यादव, सागर विजय यादव, स्नेहल सागर यादव, कल्पना विजय यादव, नंदिनी मुकेश खांदवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी येथे येथे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव व त्यांचा पुतण्या सागर यादव यांचे सामाईक व्यावसायीक गाळे असून त्यांच्या वाटपाबाबत न्यायालयात दावा सुरु आहे, सागर यादव त्याच्या ताब्यातील गाळ्याची खिडकी दुरुस्त करताना वैभव यादव यांनी सागरला गाळ्यांचा न्यायालयात दावा सुरु आहे.
तू काही तोडफोड करु नको, असे म्हटल्याने त्यांच्यात वाद झाले. दरम्यान, दोघांच्या कुटुंबातील महिलांसह आदी लोक समोरासमोर आल्याने त्यांच्यात अजूनही वादावादी होऊन हाणामारी झाली.
याबाबत सागर विजय यादव व स्नेहल वैभव यादव यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत.
पोलिसांनी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव माधव यादव, तुषार वैभव यादव, स्नेहल वैभव यादव, सुनिता वैभव यादव, सागर विजय यादव, स्नेहल सागर यादव, कल्पना विजय यादव, नंदिनी मुकेश खांदवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राकेश मळेकर हे करीत आहेत.





