Pune District : वृक्षतोड रोखण्यासाठी नागरिकांना पुढाकार घ्यावा

मंचर : आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून समाजसेवा व देशसेवा करा. शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करा. प्राणीसंवर्धन, परिसरात होणारी वृक्षतोड, जंगलतोड व प्राण्यांची शिकार रोखणे ही केवळ वनविभाग किंवा सरकारची जबाबदारी नसून आपण ही त्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन सहाय्यक वन संरक्षक अधिकारी अमृत शिंदे यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शालेय वर्ष २०२५-२६ साठीचा विद्यार्थी परिषद पदग्रहण समारंभ पार पडला. या सोहळ्यात नव-नियुक्त विद्यार्थी परिषदेला विशिष्ट जबाबदाऱ्या देऊन नेतृत्वाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले.कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून सहाय्यक वनसंरक्षक, वर्ग १ अधिकारी अमृत शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नवनिर्वाचित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशासन अधिकारी शामल चौधरी, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य शबनम मोमीन व उपप्राचार्य रजनी बाणखेले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी परिषदेने शपथ घेतली.शालेय परिषद स्कूल कर्णधार –विहान सांडभोर,स्कूल उपकर्णधार – दीप गुजराथी,ब्ल्यू स्ट्रायकर्स हाऊस-हाऊस कर्णधार माही ढोबळे,हाऊस उपकर्णधार –रोहन खळदकर,क्रीडा प्रमुख –नंदिनी कोबल,सीसीए प्रमुख –कृतिका बनसोड,शिस्त प्रमुख –अनन्या थोरात,ग्रीन चॅलेंजर्स हाऊस-हाऊस कर्णधार आदेश घोलप,हाऊस उप कर्णधार –निधी बांगर,क्रीडा प्रमुख –आर्या डोके,सीसीए प्रमुख – तन्मय गोपाळे,शिस्त प्रमुख –अगत्या पाटे,ऑरेंज वॉरियर्स हाऊस-हाऊस कर्णधार वेदान्त बटवाल,हाऊस उपकर्णधार –सई शेवाळे,क्रीडा प्रमुख –विभी शहा,सीसीए प्रमुख –तनिश गौरकर,शिस्त प्रमुख – वरद लबडे,रेड रायडर्स हाऊस हाऊस कर्णधार –यशराज मोढवे,हाऊस उप कर्णधार –सृष्टी थिगळे,क्रीडा प्रमुख –शौर्य वाडेकर,सीसीए प्रमुख – नक्षत्रा थोरात,शिस्त प्रमुख –रूद्र नितीन भालेराव या प्रमाणे आहे.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचालन साईना पवार व हदिका सय्यद विद्यार्थिनींनी केले.





