Pune Distric: छत्रपती शिवाजी महाराज की…

गराडे : स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा किल्ले पुरंदर येथे जन्म झाला. त्यामुळे त्यांच्या जनमस्थळापासून पुरंदर किल्ला ते श्रीक्षेत्र तुळापूर येथील वढु बुद्रुक पर्यंतचा पायी पालखी सोहळा बुधवारी (दि. 26) पुरंदर किल्ला येथून हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आणि मोठ्या दिमाखात प्रस्थान ठेवले. यावेळी जय शिवजी, धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो, हर हर महादेव या जयघोषाने किल्ले पुरंदर दुमदुमले होते.
पुरंदर किल्ल्यावर बुधवारी सकाळी वेगवेगळ्या फुलांची आरास व सजावट करून पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी सभागृहात राजे संभाजी महाराज यांच्या पादुकांना अभिषेक व पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित हजारो शिवभक्तांनी जिजाऊ वंदना व शिववंदना झाली.
त्यावेळी आरती महिलांनीच केली. त्यानंतर पालखीत पादुका ठेऊन या सोहळ्याने किल्यावरुन प्रस्थान ठेवले. त्यानंतर पुरंदर किल्ला घोषणाच्या जयघोष्यात पालखी पुरंदर किल्ल्याखाली उतरली. पालखीचा पहिला विसवा श्रीक्षेत्र नारायणपूर येथे सकाळी साडेअकरा वाजता पोहोचल्यानंतर नाष्टा करून पोपटमहाराज स्वामी यांच्या हस्ते पादुकांचे पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी मंदिराचे व्यवस्थापक भरतानाना क्षीरसागर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, सरपंच प्रदीप बोरकर, अॅड. तानाजी घारे, एम. के. गायकवाड, सागर काळे व पालखी सोहळ्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वामी पोपट महाराजांच्या हस्ते धाराऊ मातेच्या वंशास साडी चोळी देऊन सनमानीत करण्यात आले. नंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली.





