पुणे जिल्हा : बोरिएंदी ग्रामपंचायतीला मिळणार नवीन इमारत

आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून भरीव निधी
यवत – प्रशासकीय कामकाज करण्यासाठी प्रशस्त इमारत असावी यासाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीमधून बोरीएंदी येथील ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी वीस लाख रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन सरपंच सविता भोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एस. टी स्टॅन्ड ते टिळेकर घर गटार करणे यासाठी देखील 2 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक प्रकाश जाधव यांच्याकडून देण्यात आली. यावेळी उपसरपंच दत्तात्रय शेलार, ग्रामपंचायत सदस्य भानुदास कुदळे, शुभांगी गायकवाड, माजी सरपंच जीवन पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड, बोरीऐंदी सोसायटीचे संचालक पिंटू कुलाळ, ग्रामसेवक प्रकाश जाधव, मंगेश भोसेकर, सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दौंडचे आमदार राहुल कुल यांनी बोरीएंदी गावासाठी प्रत्येक वेळेस भरघोस निधी देऊन गावच्या विकासात भर घालण्यासाठी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे. यातून आम्हाला आमच्या गावच्या विकासात आणि वैभवात भर घालण्यासाठी मोठी मदत झाली आहे.
– सविता भोसेकर, सरपंच बोरीएंदी.





