पुणे जिल्हा : जेजुरीत भाजप सदस्य नोंदणीची भंडार उधळून सुरुवात

जवळार्जुन – जेजुरीत भाजप सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या पायथ्यापासून भंडारा उधळून करण्यात आली.
पुरंदर-हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा सरचिटणीस आकाश कांबळे, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अजिंक्य टेकवडे, पुणे जिल्हा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष, आबासाहेब थोरात, शिवसेना जेजुरी शहराध्यक्ष आबासाहेब थोरात, आरपीआयचे अध्यक्ष गौतम भालेराव, आरपीआयचे नेते पंढरीनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते तानाजीराव मरकड, सचिन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सरचिटणीस कल्पेशजी सूर्यवंशी, चंद्रकांत जगताप, उपाध्यक्ष विजय जाधव, कामगार आघाडी अध्यक्ष सचिन कापडे, उद्योग आघाडी अध्यक्ष सचिन मोरे, कामगार आघाडी सरचिटणीस सोमनाथ मदने, कामगार आघाडी संपर्कप्रमुख सागर खोमणे, महिला मोर्चा अध्यक्ष उमा कुंटे, सरचिटणीस संपदा खोमणे, अर्चना पोकळे, उपाध्यक्ष सविताताई घोडके आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी पुणे जिल्हा भ. वी. आघाडी अध्यक्ष रवीकाका खोमणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, भाजप जेजुरी शहर अध्यक्ष गणेश भोसले प्रस्ताविक केले. उपाध्यक्ष रवींद्र कोशे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले.





