Pune District : उन्हाळ्यामुळे लिंबाच्या दरामध्ये मोठी वाढ

लोणी देवकर : गतवर्षी इंदापूर तालुक्यात उन्हाळी हंगामामध्ये घरोघरी सरबत व जेवणामध्ये लागणार्या लिंबाच्या दरामध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागामध्ये लिंबाचा किरकोळ विक्रीसाठी प्रति लिंबू रुपये आठ ते दहा एवढा झाला आहे.
अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रति लिंबू दर हा फक्त रु. 1 ते 2 असा होता; परंतु सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे लिंबास मोठी मागणी वाढली आहे. परिणामी, बाजारामध्ये लिंबाची वाढती मागणी व आवक कमी यामुळे लिंबू दरात वाढ झाल्याचे येथील लिंबू उत्पादक शेतकर्यांनी सांगितले. ग्रामीण भागामध्ये लिंबाच्या बागा कमी प्रमाणात असून, लिंबाच्या बागा वाढण्याची गरज काही शेतकर्यांनी व्यक्त केली.
बाजारात परराज्यातील लिंबावर मदार
सध्या बाजारातील लिंबाची आवक घटल्याने इंदापूर तालुक्यातील बाजारात कर्नाटक आणि आंध्रप्रदेश राज्यातून लिंबाची आवक झाल्याने बाजारात सध्या परराज्यातील लिंबाची मदार असल्याचे चित्र दिसत आहे.





