पुणे जिल्हा : येवलीतील ग्रामस्थ भजनी मंडळाची पंढरपूर मंदिरात भजन सेवा

भोर – येवली (ता.भोर) येथील ग्रामस्थ भजनी मंडळास महाराष्ट्राचे दैवत श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री पांडुरंगाचे मंदिरातील रुक्मिणी सभामंडपात भजन सेवेचा प्रथमच मान मिळाला. येवली येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील धुमाळ व नारायण खंडाळे यांनी विठ्ठल मंदिर समितीकडे भजन सेवेकरीता अर्ज केला होता. भजनी मंडळाने गुरुवार (दि.२८) ला दुपारी १ ते ४ भजन सेवा केली.या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी येवली,सांगवी ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
गेली १७ वर्षे येवली,सांगवी ते पंढरपूर पायी दिंडी जात आहे. यामध्ये असंख्य भाविक यामध्ये सहभागी होत असतात. तसेच गावात अखंड हरिनाम सप्ताह चालू असतो व असे अनेक धार्मिक उपक्रम राबविले जातात. या अलौकिक सोहळ्यात विणेकरी सूनील धुमाळ, नारायण खंडाळे, रमेश खंडाळे,
चंद्रकांत खंडाळे , विष्णू खंडाळे , शिवाजी खंडाळे, शुभम बांदल , उत्तम खंडाळे, नितीन कापरे , चंद्रकांत बरकडे , विजय धाडवे, आशा कापरे, प्रमिला खंडाळे,सुरेश गव्हाणे, संतोष खंडाळे, दत्तात्रय कदम, नंदा खंडाळे, मनिषा खंडाळे, लक्ष्मी गव्हाणे, बाळासाहेब बुदगुडे, सुरेश खंडाळे,रामचंद्र भिलारे, आशा खंडाळे ,अनिता खंडाळे, रंजना जांभुळकर,रेखा गायकवाड, विमल गायकवाड,कलाबाई कापरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.





