पुणे जिल्हा : बारामतीची सुपूत्री स्नेहा देशखैरे झाली अर्थतज्ञ

बारामती : स्नेहा सागर देशखैरे हिने नुकतीच आंतरराष्ट्रीय व्यवसाय आर्थिक आणि वित्त याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान व महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.
1930 मध्ये सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीने स्थापित केलेली गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, रिसर्च सेंटर पुणे ही देशातील अर्थशास्त्रातील सर्वात जुनी संशोधन व प्रशिक्षण संस्था आहे. अशा संस्थेत स्नेहाने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणार्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणतात.
स्नेहाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विद्या प्रतिष्ठानचे बालविकास मंदिर पिंपळी याठिकाणी झाले. उच्च माध्यमिक टी.सी.कॉलेज येथे 12 सायन्स व सिंबायोसिस कॉलेज SB रोड,रोड पुणे .याठिकाणी बी.ए.(अर्थशास्त्र) पदवी घेतली. त्यानंतर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, रिसर्च सेंटर पुणे येथे एम.एस्सी (इंटरनॅशनल बिझनेस इकॉनॉमिक्स ऍण्ड फायनान्स) येथे मास्टर डिग्री प्राप्त केली.
स्नेहाला आंतरराष्ट्रीय व्यापार, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूक, थेट विदेशी गुंतवणूक, आंतरराष्ट्रीय तांत्रिक/आर्थिक सहयोग आणि संयुक्त उपक्रम, आंतरराष्ट्रीय वित्त आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन करेल.





