वाल्हे – पुणे जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवार दि.२ जानेवारीला मतदान झाले होते. यांची मतमोजणी मंगळवार (दि. ४) पुणे येथील अल्पबचत भवनात शांतते पार पडली.
यामध्ये, वाल्हे (ता.पुरंदर) सारख्या ग्रामीण भागातील व सर्वसामान्य कुटुंबातील, प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचा प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. ते सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा विरोधात असलेल्या दादासाहेब फराटे यांना २६४ मते मिळाली. तर दुर्गाडे यांना ९४८ मते मिळाली आहे. एकूण ६८४ मतांच्या मताधिक्याने डॉ.दिगंबर दुर्गाडे विजयी झाले आहेत.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे यापूर्वीही जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक व माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. ड वर्गातील या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दादासाहेब फराटे हे प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण करतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, प्रचंड बहुमत मिळवून प्रा. दुर्गाडे यानी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुर्गाडे यांच्या निवडीनंतर पुरंदर तालुक्यात व वाल्हे परिसरात आनंद व्यक्त केला जातो आहे.
यावेळी वाल्हे येथील सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, अशोक बरकडे, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, धनंजय पवार, बाळासाहेब भुजबळ, संत्यवान सूर्यवंशी, जयवंत भुजबळ, नारायण पवार, शंकर भुजबळ, संदेश पवार, प्रा. संतोष नवले आदींनी अभिनंदन केले. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
एकूण मतदान १२२९ अवैध मतदान १६ वैध मतदान १२१३ प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे ९४८ दादासाहेब फराटे २६५ वाल्हे गावचा डिगा मास्तर पुन्हा जिल्हा बँकेवर. सलग तिन वेळा जिल्हा बँकेवर निवड.
“ओबीसी वर्गातून तिकिट मिळेल असे असताना, ‘ड’ वर्गातून ओपन मधुन उपमुख्यमंञी अजित पवार यांनी संधी दिली. पक्षांची मोठी ताकत पाठीशी उभी होती. तसेच मागील आठ – दहा दिवसापासून, अनेक कार्यकर्ते स्वखर्चाने, स्वतःच्याच घरचा डबा बरोबर घेऊन, प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच, इतक्या मताधिक्याने निवडणू येता आले”; असे मत प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.