Pune District : मंचर पोलीस ठाण्यात बेवारस वाहनांचा आज लिलाव

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) येथील मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने ६३ बेवारस वाहनांचा लिलाव शुक्रवार, दि.११ रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे, अशी माहिती मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी दिली.
“गेल्या अनेक वर्षांपासून ही वाहने पोलीस ठाण्यात पडून आहेत. या वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चासी नंबर, इंजिन नंबर यांच्या माहितीसह वर्तमानपत्रातून, मालकांना पत्र पाठवूनही व यापूर्वी आवाहन करून देखील बेवारस वाहनांचा ताबा घेण्यासाठी मंचर पोलीस ठाण्यात आतापर्यंत कोणीही आलेले नाही. लिलाव होण्यापूर्वी मूळ मालक कागदपत्र घेऊन आल्यास त्यांना वाहन दिले जाईल.
लिलावानंतर कुणाचीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. याची नोंद घ्यावी. या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी शॉप अॅक्ट लायसन्स, आधार कार्ड व कागदपत्रांसह मंचर पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उपस्थित रहावे.
पोलीस सहाय्यक फौजदार एस.एन.कायगुडे यांच्याशी संपर्क करावा.” असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी केले आहे.





