Pune District : श्री सिद्धेश्वर महाराज, माता जोगेश्वरीस आकर्षक महापूजा
Updated On:

नायगाव – पुरंदर तालुक्यातील नायगाव येथे गुरुपौर्णिमा निमित्त भाविकांनी श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांच्या दर्शनाचा लाभ घेतला. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची आकर्षक महापूजा पुजारी पार्थ जगताप यांनी केली.
गुरु पौर्णिमेनिमित्त पहाटे पांडेश्वर येथून ग्रामस्थांनी आणलेल्या कर्हेच्या पाण्याने श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांना स्नान घालण्यात आले. पुंडलिक महाराज नागवडे (खामगाव) यांच्या सुश्राव्य किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.
त्यांनी अनेक उदाहरणे देऊन भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना कांबळे महाराज, राजगुरू महाराज व मृदंग साथ तेजस खेसे यांनी दिली. भजन साथ नायगाव भजनी मंडळाने दिली.विणेकरी मधुकर चौंडकर होते.





