Pune District : पाणवठे आटल्याने पशुपक्ष्यांची पाण्यासाठी वणवण

मंचर : वाढत्या उन्हामुळे सगळीकडे पाणवठे आटले असून पशू पक्षांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. पशु पक्षांना पिण्याचे पाणी सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घराशेजारी एखाद्या पाण्याच्या भांड्यामध्ये पाणी उपलब्ध करून दिल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल. असे आवाहन पशु पक्षीं प्रेमींनी केली आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर मंचर बस स्थानकासमोरील बाजूस एक छोटासा खड्डा पडला असून त्यात दूषित पाणी साचलेले आहे. खड्ड्यातील पाणी दूषित असले तरी या दूषित पाण्याने कबूतर पक्षी आपली तहान भागवताना दिसत आहे. हे दृश्य सोशल मिडीयावर व्हायरल झाले.
हे दृश्य जरी सामान्य वाटत असलं तरी त्यावर विचार करता पशू पक्षांवर आज ही वेळ फक्त मानवामुळे आली असून मानवाने आपली प्रगती साधताना पशू पक्षांच्या नैसर्गिक अधिवासावरच घाला घातलाय, विकासाच्या नावाखाली शहरातील आणि ग्रामीण भागातील ओढे, नाले, तळी बुजविल्याने पशू पक्षांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. कडाक्याचा उन्हाळा असल्याने पशु पक्षांना पिण्याचे पाणी पिण्यासाठी भटकंती करावी लागते. यासाठी प्रत्येकाने पिण्याच्या पाण्यासाठी सोय केली तरी पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचा सामना करण्याची पाळी येणार नाही.
मागील काही वर्षांपासून शहरीकरण सर्वत्र झपाट्याने वाढले आहे..रोज वाढत आहे.सर्वत्र इमारती झाल्या आहेत.पशू पक्षांसाठी पाण्याचे स्रोत नाहीसे झाले आहेत, त्यांना पाण्याच्या शोधात त्यांचा नैसर्गिक अधिवास सोडून दूर दूर वर फिरावे लागते, त्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. आपल्या घर, इमारतीच्या आसपास आणि वर सुद्धा सावलीच्या ठिकाणी पाणी ठेवले पाहिजे.
-महेश थोरात,माजी उपसरपंच, मंचर.





