Pune District : दिशातर्फे आनापान साधना
Updated On:

बारामती : येथील दिशा ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना सकाळी मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना देण्यात आली. आजची तरुण पिढी मोबाइल, सोशल मीडियामुळे तणावग्रस्त आयुष्याकडे ओढली जात आहे. मोबाइल पाहणे किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त वेळ वाया घालवणे असे बरेचसे प्रकार होत असतात.
यामधून मनाची एकाग्रता कमी होणे, अभ्यासाचा ताण येणे, अभ्यास न होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आत्मविश्वास ही कमी होतो आहे.
मेडीटेशनमुळे चिंता, तणाव कमी होतो. स्मरणशक्ती वाढते, मनाची एकाग्रता वाढते. बारामती विपश्यना समितीच्या मदतीने मित्र उपक्रमांतर्गत दिशा ॲकॅडमीतील 35 विद्यार्थ्यांना आनापान साधना देण्यात आली.





