Pune District : बारामतीत ॲलोपॅथी डॉक्टरांची बंदची हाक

राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध : आज निषेध करणार
बारामती – राज्य शासनाने होमिओपॅथी डॉक्टरांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्य संघटनेच्या निर्णयानुसार शुक्रवार (दि.११) सकाळी ८ पासून २४ तासांसाठी बारामतीतील अत्यावश्यक सोडून सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत न्यायालयात याचिका असतानाही हा निर्णय घेतलाच कसा, असा सवाल इंडियन मेडिकल असोसिएशनने केला आहे.
बारामती आयएमएच्या कार्यकारिणीने निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करीत बंदची हाक दिली आहे. राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात (दि.११) सकाळी ८ ते (दि.१२) सकाळी ८ या वेळेत सर्व डॉक्टर्स वैद्यकीय सेवा बंद ठेवतील.
(अत्यावश्यक सेवा वगळून). (दि.१९) मुंबईत मोर्चा काढला जाणार असल्याचे बारामती शाखाध्यक्ष डॉ. संतोष घालमे, सचिव अमोल भंडारे, खजिनदार डॉ. सौरभ निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी कार्यकारीणीतील डॉ. अशोक तांबे,
डॉ. संजय पुरंदरे, डॉ. महेंद्र दोशी, डॉ. विक्रांत धोपाडे, डॉ. दिनेश ओस्वाल,डॉ. सौरभ मुथा, डॉ. विभावरी सोळुंके, डॉ. स्नेहलता पवार, डॉ. रेवती संत, डॉ. प्राजक्ता पुरंदरे, डॉ. दिपीका कोकणे, डॉ. शुभांगी वाघमोडे आदी उपस्थित होते.





