पुणे जिल्हा : मंचर येथे शुक्रवारपासून कृषी महोत्सव

चार दिवसीय प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात
मंचर – आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितिच्या आवारात शुक्रवार (दि. 26) ते सोमवार (दि. 29) असे चार दिवसीय शेतकरी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या कृषी प्रदर्शनाचे संयोजक आणि शरद सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील आणि पुणे जिल्हा अॅग्रो डीलर्सचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली.
कृषी महोत्सवाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ मंचर, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि आडत व्यापारी असोसिएशन, अनुसया उन्नती केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आल्याची माहिती रोटरी चे अध्यक्ष प्रशांत बागल, सचिन काजळे, संतोष पोखरकर, संजीव भंडारी यांनी दिली.
प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात कृषीसंबधीत नवनवीन अवजारे, घरघूती वापराच्या वस्तू, सौर उर्जेवर चालणार्या वस्तू, रोपवाटिका, पशुखाद्य, शेतीतील आधुनिक सिंचन, राष्ट्रीय बहुचर्चित कंपन्याचे बियाणे, औषधे, खते, इलेट्रिक व इलेट्रॉनिक वस्तू, ट्रक्टर तर जिल्यातील विविध महिला बचत गटाच्या घरघूती उद्योगाचे स्टॉल, विविध मसाले, लोणची ,
शाकाहारी व मांसाहारी जेवणाचे एकूण सुमारे 250 पेक्षा अधिक स्टॉल लावले जाणार आहेत.हे प्रदर्शन सकाळी 9.30 ते 6.30 पर्यंत खुले राहणार असून कृषी प्रदर्शनला भेट देणार्या सर्व नागरिक व शेतकर्यांना लकी ड्रॉ कूपनद्वारे आकर्षण भेट वस्तू देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितिचे अध्यक्ष वसंत भालेराव यांनी केले आहे.





