Pune District : गांजा विक्री प्रकरणी आरोपीस पाच वर्षे कारावास

महाळुंगे इंगळे : खालुंब्रे (ता. खेड) येथील एकाने अवैधरितीने गांजा विक्री केल्याने खेड (राजगुरूनगर) जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास आणखी एक वर्ष सश्रम कारावास, अशी शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
एप्रिल 2024 मध्ये गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त शिवाजी पवा, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौर, महाळुंगे इंगळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष जायभाय यांनी उत्कृष्ट तपास केला.
तसेच या गुन्ह्यातील गांजा विक्री प्रकरणी आरोपींना न्यायालयाने फास्टट्रॅकवर गुन्हा चालवल्याने एक वर्षाच्या आत आरोपीला शिक्षा ठोठवली आहे. आरोपपत्र सादर केल्यापासून एका वर्षाच्या आत न्यायालयाने शिक्षा झालेल्या गुन्ह्यात हा गुन्हा पहिलाच असल्याची माहिती मिळाली.





