Pune District : कल्याण-अहमदनगर महामार्गावर अपघात

बेल्हे – गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथे कल्याण-अहमदनगर महामार्गावर सोमवारी (दि. २२) दुपारी झालेल्या अपघातामुळे सुमारे अडीच ते तीन तास मोठी वाहतूक कोंडी झाली. बेल्हे ते राजुरीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या महामार्गावरील सिमेंट काँक्रीटचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून बेल्हे ते आळेफाटा या ९ किलोमीटरच्या टप्प्यावर काम सुरू आहे. कामाचा वेग कमी असल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. रांजणगाव एमआयडीसी आणि शिरूरला जाणाऱ्या मालवाहतूक गाड्यांची संख्या या रस्त्यावर जास्त असल्याने नेहमीच गर्दी असते.
सोमवारी दुपारी याच मार्गावर गुंजाळवाडी येथे एका एरटिगा गाडीला आणि छोटा हत्तीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीसाठी असलेला अरुंद रस्ता आणि अपघातामुळे वाहनचालकांमध्ये वारंवार वाद होत आहेत.
सोमवारी दुपारी दोन वाहनांचा अपघात झाला. सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी झाली होती. ३ – ४ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्याचे काम जलद पूर्ण करावे.
-रामा गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते





