Pune District: ओतूर पोलीस ठाण्यातील बेवारस वाहनांचा उद्या लिलाव

ओतूर : येथील पोलीस ठाण्याच्या वतीने 67 बेवारस वाहनांचा लिलाव मंगळवारी (दि. 8) करण्यात येणार असल्याची माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक लहू थाटे यांनी दिली.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ही वाहने पोलीस ठाण्यात पडून आहेत. या वाहनांचे रजिस्ट्रेशन नंबर, चासी नंबर, इंजिन नंबर यांच्या माहितीसह वर्तमानपत्रातून तसेच यूट्यूब चॅनल मार्फत यापूर्वी आवाहन करून देखील बेवारस वाहनांचा ताबा घेण्यासाठी ओतूर पोलीस स्टेशन येथे आजअखेर कोणीही आलेले नाही.
त्यामुळे या बेवारस वाहनांचा स्क्रॅपमध्ये लिलाव करण्यात येणार आहे. या लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या भंगार विक्रेते दुकानदारांना सहभागी व्हायचे आहे.
त्यांनी शॉप अॅक्ट लायसन्स आणि आधार कार्ड या कागदपत्रांसह ओतूर पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार विलास कोंढवळे यांना संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत असल्याचे थाटे यांनी सांगितले.





