Pune District : वाल्ह्यात भरली विठ्ठल नामाची शाळा
Updated On:

वाल्हे – पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयामध्ये शनिवरी (दि. 5) पालखी मिरवणूक आणि विठूनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा रंगला.हातात भगव्या पताका, डोक्यावर टोपी, कपाळी केशरी गंध, गळ्यात टाळ घेतलेले विद्यार्थी, नऊवारीत नटून-थटून डोक्यावर तुळस घेऊन आलेल्या विद्यार्थिनींना पाहून विठ्ठल नामाची शाळा भरल्याचा प्रत्यय आला.
भक्तिमय वातावरणात चिमुकल्यांनी फुगडी खेळत टाळांच्या गजरात ग्यानबा तुकाराम व विठूनामाचा जयघोष केला. या पालखी सोहळ्याद्वारे विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश
देणार्या दिंडीद्वारे झाडे लावा झाडे जगवाचा संदेश देण्यात आला. तर दुसरीकडे विठ्ठल- रखुमाई, मुक्ताबाई, वारकरी आदिंची वेशभुषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या.





