Pune District: घरफोड्या करणार्या अट्टल चोरट्यास बेड्या

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलीस ठाणे हद्दित उंब्रज नं. 1 व नं. 2 परिसरात तसेच आळेफाटा पोलीस ठाणे हद्दितील काळवाडी, पिंपळवंडी परिसरात घरफोडी करणार्या अट्टल चोरट्याच्या मुसक्या ओतूर पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याकडून 10 लाख 55 हजार 393 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
आरोपीस न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
मोबाइल लोकेशन, तांत्रिक माहिती तसेच बँक व गोल्ड लोन खात्याच्या आधारे अट्टल चोरटा अक्षय यशवंत शिंगोटे (रा. उंब्रज नं. 1, ता. जुन्नर)च्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या.
त्याच्यावर ओतूर पोलीस ठाण्यात 4, आळेफाटा पोलीस ठाण्यात 3 व खेड पोलीस ठाण्यात 1 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एस. आमणे, पोलीस हवालदार संदीप लांडे, भरत सूर्यवंशी करत आहेत.





