पुणे जिल्हा । जुन्नर मतदारसंघात 68.94 टक्के मतदान

जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदार संघामधील 3 लाख 25 हजार 764 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 68.94% इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघात एकूण पुरुष मतदार संख्या 1 लाख 65 हजार 386 इतकी असून त्यापैकी 1 लाख 18 हजार 45 जणांनी मतदान केले. तर महिला मतदार संख्या 1 लाख 60 हजार 385 इतकी असून त्यापैकी 1 लाख 65 हजार 36 महिलांनी मतदान केले.
या मतदारसंघात बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत 224585 इतके मतदान झालेले असून 68.94 टक्के इतके मतदान झालेले आहे. या मतदार संघातील ग्रामीण तसेच शहरी भागात मतदारांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत होता.
दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदानाकरिता बाहेर पडले होते. जुन्नर विधानसभा निवडणुकीकरिता 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून या सर्वांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालेले असून या झालेल्या मतदानाची मतमोजणी शनिवारी (दि. 23) सकाळपासून सुरू होणार आहे.





