Pune District : भामा आसखेड धरणात 54.25 टक्के साठा
Updated On:

यंदा चारपट अधिक पाणी
पुणे, पिंपरी-चिंचवड, आळंदी व चाकणकरांच्या पाण्याची चिंता मिटली!
शिंदे वासुली – पुणे शहराचा पूर्व भाग, तीर्थक्षेत्र आळंदी, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण शहराला पाणीपुरवठा करणारे भामा आसखेड धरण 50 टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात चार पट अधिक पाणीसाठा जमा झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 8.44 टीएमसी असून सद्यस्थितीत 4.66 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी केवळ 1.10 टीएमसी पाणीसाठा होता. यंदा 54.25 टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे.
धरणातून लवकरच पिंपरी-चिंचवड शहरालाही पाणीपुरवठा सुरू होणार असून त्यासाठी 2.14 टीएमसी पाणी वितरित करण्यात येणार आहे.





