Pune District : घोडेगाव लोकन्यायालयामध्ये ४९ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली

घोडेगाव : घोडेगाव न्यायालयात आयोजित लोकन्यायालयामध्ये ४९ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. विविध प्रकरणांमध्ये ७२ लाख १९ हजार ६०५ रुपयांची वसुली झाली आहे. अशी माहिती वकील संघाचे अध्यक्ष अॅड. समीर निघोट यांनी दिली.
घोडेगाव न्यायालयात लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन न्यायाधीश एस. एस. पुळुजकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी फौजदारी आणि दिवाणी स्वरूपाची अनेक प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यात आली. ४९ दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. अनेक पतसंस्था, बँका यांनी लोकन्यायालयात सहभाग घेतला.७२ लाख १९ हजार ६०५ रुपयांची वसुली झाली आहे.
यावेळी घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. समीर निघोट,उपाध्यक्ष अनिता पाटील, बाळासाहेब पोखरकर, मुकुंद वळसे पाटील, नवनाथ निघोट, सागर गावडे, दीपक लोहटे, चेतन उदावंत, इरफान शेख, अर्चना काळे, अश्विनी दगडे व इतर सर्व वकील वर्ग उपस्थित होते.
यापुढील काळात देखील पक्षकारांनी लोकन्यायालयामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे सामंजस्याने मिटवणेबाबत न्यायाधीश एस. एच. पुळूजकर, घोडेगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड समीर निघोट यांनी पक्षकारांना आवाहन केले.





